HER (ती) HEALTH+
in association with
Sruja Women’s Healthcare

एएसएमच्या कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (CSIT) महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि महिला प्राध्यापकांसाठी ‘Her Health+’ या आरोग्यविषयक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जगमंगल सोशल फाउंडेशन (JMSF) आणि सृजा वुमेन्स हेल्थकेअर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात मासिक पाळीचे आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, मानसिक स्वास्थ्य, ध्यानधारणा आणि पीसीओएस (PCOS) यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सुश्री सरिता गोयल यांनी उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थिनींसोबतच महिला प्राध्यापकांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढण्यास मदत होते, असे सांगत त्यांनी हा उपक्रम राबवल्याबद्दल JMSF आणि सृजा वुमेन्स हेल्थकेअर यांचे अभिनंदन केले. तसेच या उपक्रमासाठी महाविद्यालयाची निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
JMSF च्या संस्थापक प्रिया गुजराथी यांनी विद्यार्थिनींचे आरोग्य, सुरक्षितता आणि संरक्षण यांसाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, “विद्यार्थीदशेत आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असू, तर आपल्या आयुष्यात अधिकाधिक यशाची शिखरे गाठू शकतो. त्यामुळे शिक्षणासोबतच आरोग्याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे.”
या उपक्रमात सृजा वुमेन्स हेल्थकेअरच्या संस्थापक डॉ. माधवी जवारे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. महिलांच्या मनात आरोग्याविषयी अनेक प्रश्न असतात; मात्र संकोचामुळे त्या अनेकदा ते विचारण्याचे टाळतात. ‘डॉक्टर, माझ्यासोबत जे घडत आहे ते सामान्य आहे का?’ या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी महिलांना संकोच न बाळगता संवाद साधता यावा, हा या सत्रामागील प्रमुख उद्देश होता.
डॉ. माधवी जवारे यांनी मासिक पाळीचे आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, मानसिक स्वास्थ्य आणि ध्यानधारणेचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पीसीओएस (PCOS) या समस्येची लक्षणे, त्याबाबत घ्यावयाची काळजी आणि वैद्यकीय सल्ल्याचे महत्त्व याविषयी माहिती दिली.
सत्रादरम्यान विद्यार्थिनींनी मासिक पाळीशी संबंधित विविध प्रश्न विचारले. मासिक पाळीच्या काळात कोणती काळजी घ्यावी, वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी आणि आरोग्याशी संबंधित लक्षणांकडे कसे लक्ष द्यावे, याविषयी त्यांनी मार्गदर्शन घेतले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थिनींना त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करून घेण्याची संधी मिळाली.
महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, आरोग्याशी संबंधित प्रश्न विचारण्याबाबतचा संकोच दूर करणे आणि विद्यार्थिनींना स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत सजग बनवणे, हा ‘Her Health+’ उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाला विद्यार्थिनी आणि महिला प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
JagMangal Social Foundation
Building safe, skilled, sustainable, and future-ready communities through education, innovation, partnerships, and measurable social impact.Building safe, skilled, sustainable, and future-ready communities through education, innovation, partnerships, and measurable social impact.
Explore
JagMangal
Legacy
Areas of Work
Programs
Impact Stories
Insights
Media
Contact.
Our Platformsd
PRAYAAS
SwayamTej Academy
SwayamTej–Squro LMS
CareerBridge 360 (Coming Soon)
Future Ready Labs (Coming Soon)
Connect
JagMangal Social Foundation
406, 4th floor, Garud Ganapati Chowk, above Oppo Showroom, Narayan Peth, Pune, Maharashtra 411030 India
Whatsapp +91 9922438424
Email- director@jmsfindia.com
© 2026 JagMangal Social Foundation. All Rights Reserved.
Privacy Policy | Terms of Use | 80G | 12A | CSR-1





